जळगाव : शहरातील राष्ट्रीय महामार्ग लगत खोटेनगर बस स्टॉप मागील फर्निचर व वेल्डिंग दुकानांना पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत २ फर्निचर व १ वेल्डिंग दुकान जळून झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तब्बल तीन ते चार तासांपर्यंत आगीचे तांडव सुरु होते. तब्बल १२ अग्निशमन बंबांच्या प्रयत्नानंतर सकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास ही आग आटोक्यात आली.

२ फर्निचर व १ वेल्डिंग दुकान जळून खाक…

खोटेनगर बसस्टॉपजवळील शिव फर्निचर या दुकानाला पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रुप धारण केले. फर्निचर दुकानांजवळील वेल्डींग दुकान पण आगीच्या लपेट्यात सापडले. पोलीस नियंत्रण कक्षातून महापालिकेच्या अग्निशमन बंबाला आगीची माहिती मिळाल्यावर तातडीने शहरातील गोलाणी मार्केट व महाबळ येथील अग्निशमन कार्यालयातील बंब घटनास्थळी दाखल झाले. आग एवढी भिषण होती की, त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड झाले होते. मिळेल त्या बाजूने वाट काढून अग्निशमन बंबांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळवले.

मोठी बातमी: राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द
१२ अग्निशमन बंबांचे पाचारण…

आगीवर नियंत्रण मिळत नसल्याने जैन इरिगेशन कंपनी तसेच एरंडोल नगरपालिकेच्या अग्निशमन बंबांनाही पाचारण करण्यात आले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे ९ बंब, जैन इरिगेशनचा एक व एरंडोल नगरपालिकेचे दोन असे तब्बल १२ बंब या ठिकाणी आग विझविण्यासाठी लागले. तब्बल चार ते पाच तासानंतर सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आली.

IPL 2022, KKR vs LSG Live Score : लखनौ आणि केकेआरच्या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स
लाखो रुपयांच्या नुकसानीचा अंदाज…

दरम्यान, ही आग कशामुळे लागली अजून हे स्पष्ट झालं नाही. या आगीत फर्निचर तयार करण्यात आलेल्या वस्तूसह दैनंदिन वापरासाठी लागणारे साहित्य जळाल्याने लाखोंचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्नीशमन कर्मचाऱ्यांच्या शर्थींच्या प्रयत्नांनी लवकर आग आटोक्यात आणल्यामुळे आजूबाजूच्या घरांना आगीच धोका टळला. अन्यथा मोठी घटना घडली असती. सुदैवाने जीवित हानी टळली. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी सहाय्यक अग्निशमन अधिकारी सुनील मोरे, अश्वजीत घरडे, रोहिदास चौधरी, भारत बारी, वाहन चालक देविदास सुरवाडे, वाहन चालक-संतोष तायडे, संजय भोईटे, वाहन चालक-प्रदीप धनगर, सरदार पाटील, भगवान पाटील, वसंत कोळी, जगदीश साळुंखे या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

Apple चे मोठे अपडेट ! iPhone यूजर्सना मिळणार अनेक नवीन फीचर्स, जे वाढवतील फोन वापरण्याचा एक्स्पीरियंस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here