हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बाबुळगाव शिवारात दोन दुचाकीच्या समोरासमोर अपघात झाला. या अपघातामध्ये एक जण ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. अनिल खांडके असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कडती व वराडी येथील चौघेजण त्यांच्या दुचाकी वाहनावर सेनगाव तालुक्यातील बाभुळगावकडे गेले होते. दुपारच्या वेळी बाबुळगाव शिवारामध्ये दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये अनिल खांडके याचा जागीच मृत्यू झाला. तर हनुमान जाधव, ऋषिकेश जाधव, हनुमान चिलगर हे गंभीर जखमी झाले.

भारताची ऐतिहासिक कामगिरी, वर्ल्ड फायनलमध्ये पोहोचणारी निखत झरीन ठरली पहिलीच महिला…
अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील,उपनिरीक्षक बाबुराव जाधव, जमादार किसन डावरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी जखमींना तातडीने हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान तिन्ही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

IPL 2022, KKR vs LSG Live Score : लखनौ आणि केकेआरच्या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here