नागपूर: संचारबंदीचा फायदा घेत जुगार भरवणाऱ्या कुख्यात अशोक यादव ऊर्फ बावाजीच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिस उपायुक्तांच्या विशेष पथकाने नऊ जुगाऱ्यांना अटक केली. मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही.

दानी पन्नालाल यादव (वय ४७रा. लालगंज), रामू रतनचंद सेठिया (वय ५५,रा. रनाळा), प्रसन्न रामकुमार जैन (वय ५० रा. सतरंजीपरा), आनंद भगवानदास श्रीवास्तव (वय ४५ रा.लालगंज), आशिष चंद्रभान ठाकूर (वय ३७, रा. शहीद चौक, इतवारी), राजू चरणदास खुराना (वय ५०, रा. पारडी), चरण कल्लू गौर ( वय ५४, रा.भानखेडा), शाग साहेबलाल पोरवाल (५९ रा.बडकस चौक) व विशाल अंबादास मेश्राम ( वय ४५, रा.गोधनी) अशी अटकेतील जुगाऱ्यांची नावे आहेत.

लॉकडाऊनमुळे पोलिस व्यस्त असल्याचा फायदा घेत बावाजी याने जुगार अड्डा भरवायला सुरुवात केली. याबाबत पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर यांना माहिती मिळाली. माकनीकर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोपान चितमपल्ले यांना जुगार अड्ड्यावर छापा टाकण्याचे निर्देश दिले. चातमपल्ले, हेडकॉन्स्टेबल रघुनाथ धुर्वे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बावाजीच्या इतवारी रेल्वेस्थानकाजवळील अड्ड्यावर छापा टाकला आणि नऊ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून १७ हजार ३०० रुपयांची रोख, १२ मोबाइल, चार मोटरसायकली आदींसह सुमारे दोन लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here