70 वर्षीय सिसिओलिना यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन पुतीन यांना युद्ध थांबवण्यासाठी ऑफर दिली आहे. रशिया आणि यूक्रेन यांच्यातील शांतता चर्चा गेल्या काही दिवसांपासून थांबली आहे. सिसिओलिना यांनी “युद्धाच्या विरोधात आणि रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यासाठी शांततेचा संदेश आहे. रशिया आणि यूक्रेन मधील लोकांच्या शांततेसाठी मी तुमच्यासोबत एक रात्र घालवण्यास तयार आहे” असं म्हटलं आहे. सिसिओलिना रियलिटी टीव्ही शो द आयलँड ऑफ द फेमसमध्ये दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांनी ही ऑफर दिली आहे.
सद्दाम हुसेन यांना देखील ऑफर सिसिओलिना यांनी यापूर्वी देखील अशा प्रकारची ऑफर दिलेली आहे. आखाती देशातील युद्धाच्या सुरुवातीच्या काळात इराकचे तक्कालीन राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना देखील ऑफर दिली होती. पुतीन यांना दिलेल्या ऑफरच्या पोस्टला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे पुतीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाहीत.
दरम्यान, रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाला आता तीन महिने पूर्ण होत आले आहेत. रशियानं युद्ध सुरु झाल्यापासून पहिल्या तीन ते चार दिवसांमध्ये यश मिळेल, असा अंदाज व्यक्त केला होता. यूक्रेनच्या कीव्हपर्यंत ताबा मिळवण्याचं रशियाचं धोरण होतं. मात्र, रशियाच्या सैन्याला यूक्रेनच्या सैन्यानं प्रतिकार केल्यानं कीव्हमधून माघार घ्यावी लागली आहे. रशियानं मारियुपोलवर ताबा मिळवला आहे. यूक्रेन युद्धामुळं रशियावर निर्बंध लादण्यात आले आहेत.