करोनाचे एका दिवसात ३५६ रुग्ण आढळून आल्याने दिल्ली हादरली आहे. एका दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीत करोना रुग्णांची एकूण संख्या ही १५१० इतकी झाली आहे. यापैकी १०७१ रुग्ण हे निझामुद्दीनमधील तबलीघी जमात मरकझशी संबंधित आहेत.
दिल्लीत गेल्या १४ तासांत ४ जणांचा करोनाने मृत्यू झालाय. दिल्लीतील एकूण २८ जणांनी जीव गमावलाय. तर ३० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
दिल्लीतील ४३ भाग सील
दिल्लीत जस-जसे करोनाचे रुग्ण समोर येत आहेत तशी कारवाई अधिक कठोर होत चालली आहे. रविवारी आणखही काही भागांना सील करण्यात आलं. यामुळे दिल्लीतील ४३ भाग आता सील करण्यात आले आहेत. या सील केलेल्या भागांमधील नागरिकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. त्यांना आवश्यक गोष्टी त्यांना घरपोच पुरवल्या जाणार आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times