नाशिक : नाशिकमध्ये मध्यरात्री २४ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावरकर चौक भागातील आकाश पेट्रोल पंपाशेजारी ही घटना घडली. यश रामचंद्र गांगुर्डे (रा. राजवाडा, म्हसरूळ) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे.
दरम्यान, मध्यरात्री घडलेल्या या हत्या प्रकरणाने शहरात चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला आणि विहिरीत पडला, नातेवाईकांकडून हत्येचा आरोप