मुंबई :मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेली ३ वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी २०१९ मध्ये आपल्या रिलेशनशिपबद्दल सोशल मीडियावर सांगितलं. गेले काही दिवस त्यांच्या लग्नाबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. असं म्हणतात, या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये दोघं लग्न करणार आहेत. लग्न सोहळा मित्र मैत्रिणी, नातलग यांच्या उपस्थितीत होईल.

लक्ष्मण पावला! इरफाननंतर नवाज करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण

अर्जुन कपूरने या बातमी संदर्भात इन्स्टाग्रामवर रिअॅक्शन दिली आहे. तो लिहितो, ‘माझ्यापेक्षा इतर लोकांना माझ्या आयुष्याबद्दल जास्त माहिती आहे, याच्याच मी प्रेमात पडलोय.’

या वर्षी मलायका-अर्जुन लग्न करणार

अर्जुन मलायका

बाॅम्बे टाइम्सच्या सूत्रांच्या माहितीनुसार, मलायका आणि अर्जुननं आपलं नातं विवाहबंधनात आणायचं ठरवलं आहे. दोघांचा लग्न समारंभ मुंबईत होईल. थंडीचा मोसम दोघांनाही आवडतो. म्हणून थंडीत लग्न करायचं ठरवलं आहे. म्हणून नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये दोघांनी लग्न करायचं ठरवलं आहे.

२०२१ मध्ये करणार होते साखरपुडा



IndiaToday.in च्या माहितीनुसार अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाच्या चर्चा या आधीही खूप रंगल्या होत्या. दोघांनी २०२१ मध्ये गुपचूप साखरपुडा करायचं ठरवलंही होतं. पण करोना महामारीमुळे ते समारंभ करू शकले नाहीत. कारण बरेच निर्बंध होते. म्हणून त्यांनी साखरपुडा रद्द केला. ते दोघं एकमेकांच्या प्रेमात इतके डुबले आहेत की आता ते लग्नच करतील, अशी त्यांच्या जवळच्या लोकांची खात्री आहे. पण अजून लग्नाची तारीख निश्चित झाली नाहीय.

हृता दुर्गुळे झाली मिसेस प्रतिक शाह, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा

नात्यावर मोकळेपणानं बोलतात दोघं



मलायका आणि अर्जुन दोघंही आता आपल्या नात्याबद्दल उघडपणे बोलतात. कसलाच आडपडदा ठेवत नाहीत. काही दिवसांपूर्वी मलायकानं अर्जुनचं कौतुक केलं होतं. माय मॅन असं म्हटलं होतं. लग्नाबद्दल विचारलं असता, यावर विचार करतोय असंही म्हणाली होती. मलायका आणि अर्जुनच्या वयात खूप अंतर आहे. मलायका ४८ वर्षांची आहे, तर अर्जुन ३६ वर्षांचा.

अरबाजसोबत मलायकानं केलेलं लग्न

मलायका अगोदर अरबाज खानची बायको होती. त्यांना एक मुलगा आहे. त्याचं नाव अरहान. अरबाज आणि मलायकानं लग्नाच्या अनेक वर्षांनी घटस्फोट घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here