नवी दिल्लीः जगातील दिग्गज आयटी कंपनी गुगलचे सीईओ असलेल्या सुंदर पिचाई यांनी भारतातील करोनाविरोधी लढाईत आपले योगदान दिले आहे. सुंदर पिचाई यांनी ला पाच कोटींची मदत दिली आहे. करोना व्हायरसमुळे घोषित झालेल्या लॉकडाऊनने परिणाम झालेल्या गरीबांना मदत करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. या आधी गुगलने करोनाविरोधी लढाईत केल्या जाणाऱ्या मदतीत ८० कोटी डॉलरची मदत जाहीर केलीय. यापैकी २० कोटी डॉलरची मदत ही छोट्या व्यावसायिकांना देण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि बँकांकडे सोपवली जाणार आहे.

गरीब आणि रोजंदारी मजुरांना मदत करण्यासाठी Give India ने मोहीम सुरू केली आहे. या मोहीमेत Give India ला आतापर्यंत १२ कोटींचा मदत निधी मिळाला आहे. सुंदर पिचाई यांनी दिलेल्या ५ कोटींच्या मदतीबद्दल Give India ने त्यांचे आभार मानले आहेत. आणि या मोहीमेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय.

देशातील मोठे उद्योगही करोनाविरोधी लढाईत भारत सरकारच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. Tata Trusts आणि Tata Sons ने सरकारला १५०० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. विप्रो लिमिटेड, विप्रो एंटरप्रायजेस लिमिटेड आणि अजीम प्रेमजी फाउंडेशनने ११२५ कोटींची मदत देण्याची तयारी दर्शवली आहे. याशिवाय अनेक कंपन्या सॅनिटायजर, मास्क आणि नागरिकांना जेवण उपलब्ध करून देत आहेत.

भारतात करोनाचे आतापर्यंत ९३५२ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ८०४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या ९८० जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर एकूण ३२४ जणांना करोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here