नाशिक : नाशिकमध्ये हत्या आणि आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात वडील आणि मुलाने आत्महत्या केली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश जाधव आणि प्रणव जाधव असं वडी आणि मुलाचं नाव आहे. सकाळी पंचवटी सीतागुंफासमोर मुलाचा खून करून वडिलांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोघांचा मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

युवा व्यावसायिक अचानक बेपत्ता झाल्याने उडाली खळबळ; अपहरणाचा संशय
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पण अद्याप आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं नसून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

आणखी एका शहरात शिवसेनेत खदखद; नाराज नेते पक्षप्रमुखांना भेटणार

108 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here