Raj Thackeray Ayodhya visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांना विरोध करण्यापासून रोखावे, अशी मागणी साध्वी कांचनगिरी यांनी केली. यासंदर्भात साध्वी कांचनगिरी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्रही लिहले आहे. तसेच राज ठाकरे अयोध्येत आल्यानंतर बृजभूषण सिंह यांनी त्यांना विरोध केल्यास त्यांना माझ्यासह साधुसंतांचा सामना करावा लागेल, असा इशाराही साध्वी कांचनगिरी यांनी दिला.

 

MNS banner in Pune
Raj Thackeray | मनसेच्या नेत्यांकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने अयोध्येत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हायलाइट्स:

  • भाजपच्या काही नेत्यांनी बृजभूषण सिंह यांना माघार घेण्याचा सल्ला दिला
  • अयोध्येत मनसेचे किती कार्यकर्ते पोहोचू शकतात, याला एक मर्यादा आहे
मुंबई:राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) मुंबईत जोरदार वातावरणनिर्मिती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून लालबाग आणि शिवडी परिसरात मनसेकडून (MNS) काही बॅनर्स लावण्यात आले आहेत. राजसाहेबांच्या (Raj Thackeray) केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल, असा मजकूर या बॅनर्सवर झळकत आहे. आता या माध्यमातून मनसे नक्की कोणाला इशारा देऊ पाहत आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच मशिदींवरील भोंग्यांविरोधात आंदोलन छेडल्यामुळे राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना धमकी देण्यात आली होती. बाळा नांदगावकर यांनी तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेत या प्रकाराची तातडीने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली होती. तर दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी उत्तर भारतीयांचा अपमान करणाऱ्या राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेऊन देणार नाही, अशी गर्जना केली होती. त्यादृष्टीने बृजभूषण सिंह सध्या उत्तर प्रदेशात जोरदार वातावरणनिर्मिती करत आहेत. साध्वी कांचनगिरी आणि भाजपच्या काही नेत्यांनी बृजभूषण सिंह यांना माघार घेण्याचा सल्ला दिला. मात्र, बृजभूषण सिंह काही केल्या ऐकायला तयार नाहीत. बृजभूषण सिंह यांचे उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये असणारे प्राबल्य पाहता राज ठाकरे यांच्यासाठी अयोध्या दौरा खडतर ठरण्याची चिन्हे आहेत.
“राज ठाकरे ५ तारखेला अयोध्येत येणारच, पंतप्रधान मोदींनी बृजभूषण सिंहांना रोखावं”
मनसेच्या नेत्यांकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने अयोध्येत येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास १० रेल्वेगाड्या बुक केल्या जाणार आहेत. तरीही अयोध्येत मनसेचे किती कार्यकर्ते पोहोचू शकतात, याला एक मर्यादा आहे. तर बृजभूषण सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील एक मोठा वर्ग त्यांच्या पाठिशी आहे. अशावेळी बृजभूषण सिंह यांचा विरोध झुगारून अयोध्येत गेल्यास राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निश्चिचत नाकारता येणार नाही.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mns banners in mumbai before raj thackeray ayodhya visit
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here