कालच्या तुलनेत आज ५०० हून अधिक नवीन करोनाचे रुग्ण समोर आले आहेत. नवीन प्रकरणांमध्ये २९.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात केरळमध्ये सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. त्याचबरोबर दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये करोनाचे ३२४ नवीन रुग्ण आढळून आले असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आदल्या दिवशी देशात सर्वाधिक २९ जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, महाराष्ट्रात २६६ रुग्ण आढळून आले असून २४१ रुग्ण बरे झाले आहेत. चाचणीच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहिला. काल येथे २०,८५७ लोकांची करोना चाचणी करण्यात आली. तर सध्या १,५५१ सक्रिय प्रकरणं असून उत्तर प्रदेशमध्ये १२९ करोना रुग्ण आढळले आणि २०२ रुग्ण बरे झाले आहेत.
खरंतर, फक्त भारतातच नाही तर उत्तर कोरियामध्येही करोनाचा कहर सुरूच आहे. ताज्या आकडेवारीनुसार, एका आठवड्यात देशातील करोना बाधितांची संख्या २० लाखांच्या जवळ पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत कोविड-१९ च्या २६२,२७० हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी, उत्तर कोरियाच्या अँटी-व्हायरस मुख्यालयाने २४ तासांत फक्त १ रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.