मुंबई: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’. आजवर मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्यामुळे ही मालिका तब्बल १४ वर्षं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अशा या लोकप्रिय मालिकेतील प्रमुख अभिनेत्यानं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं कळतं.
…म्हणून प्रतिकशी लग्न करतेय; नेटकऱ्यांनी हृताला केलं होतं ट्रोल
तारक मेहता ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. सध्या शैलेश यांनी मालिकेचं चित्रीकरणही बंद केलं आहे. दिशा वकानी म्हणजेच दयाबेनच्या पाठोपाठ मालिकेतील आणखी एका प्रमुख कलाकारानं मालिका सोडल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसू शकतो. या चर्चा सुरू असतानाच शैलेश यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि चर्चेला आणखी हवा मिळाली.

शैलेश यांनी हिंदी कवितेच्या दोन ओळी शेअर केल्यात.’हां मजबूत से मजबूत लोहा टूट जाता है कई झूठे इकठ्ठे हों, तो सच्चा टूट जाता है.’शैलेश यांनी लिहिलेल्या या दोन ओळी नेमक्या कोणासाठी आहेत, याबद्दल आता सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

…म्हणून घेतला मोठा निर्णय
शैलेश लोढा यांनी मालिकेच्या निर्मात्यांना दिलेल्या तारखांचा योग्य वापर न केल्यानं अनेक चांगल्या कामाच्या ऑफर नाकाराव्या लागल्या होत्या. त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झाल्यानं ते नाराज होते. याच नाराजीमधून त्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah च्या चाहत्यांना मोठा धक्का, या प्रमुख अभिनेत्यानं सोडली मालिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here