‘काँग्रेस फक्त पैशांसाठी काम करत आहे. मी काही अपेक्षा आणि स्वप्नांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र हा निर्णय चुकीचा होता आणि आज याबाबत मी माफी मागतो,’ असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे.
‘पटेल समाजावर काँग्रेसकडून अन्याय’
पटेल आरक्षण आंदोलनाचा चेहरा म्हणून समोर आलेल्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसनेही त्यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर हार्दिक यांनी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोप करत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘गुजरातमध्ये पटेल समाजासह इतर सर्वज समाजांवर काँग्रेस अन्याय करत आहे. काँग्रेसमध्ये सत्य बोलल्यास मोठे नेते तुम्हाला बदनाम करतात. काँग्रेस महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलत नसून असंच सुरू राहिलं तर हा पक्ष पुढील २० वर्षांतही सत्ता मिळवू शकत नाही,’ अशा शब्दांत हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे.