पिंपरी : अलंकापुरी म्हटलं की नाव येतं ते संत ज्ञानेश्वर माऊलींचं. आळंदीत वैष्णवांचा मेळा भरला जातो. मात्र, आळंदी शहर सध्या वेगळ्याच नावाने चर्चेत आले आहे. आळंदी शहरात वेश्या व्यवसाय वाढत चालला आहे. या विरोधात स्थानिक नागरिकांनी देहू फाटा चौक इथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी संबंधित वेश्या व्यवसायासाठी उभ्या राहणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाईची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

या संदर्भात महिला सामाजिक कार्यकर्तीने देहू फाटा चौकात ग्राहक शोधत असलेल्या एका महिलेला हटकले तिला असले प्रकार रस्त्यावर चालणार नाही. तुमच्यामुळे महिला बदनाम होतात असे सांगितले. मात्र, संबंधित महिलीने त्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेस कापून टाकण्याची धमकी दिली.

मुंबईच्या उंबरठ्यावर करोनाचं संकट, ठाण्यात नव्या रुग्णांची संख्या वाचलीत का?
यामुळे स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले होते. त्यांनी या महिलांवर कारवाई करण्यासाठी रस्त्यावरच ठिय्या मांडला. घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. इथं चालणारा वेश्या व्यवसाय तात्काळ बंद करण्याची मागणी येथील आंदोलन कर्त्या नागरिकांनी केली आहे.

या संदर्भात आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आणि दिघीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे यांनी घटनास्थळवरून संबंधित महिलेला आणि तिला मदत करणाऱ्या रिक्षा चालकाला ताब्यात घेतले. तसेच स्थानिक नागरिकांना विश्वासात घेत अशा घटना पुन्हा या परिसरात घडणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. त्यानंतर स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

नाशिक हादरलं​! आधी मुलाचा गळा दाबला नंतर वडिलांनी केली आत्महत्या
आळंदी शहर परिसर हा वेश्या व्यवसायाचा केंद्र बिंदू बनत चालला आहे. या भागात महिला मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसायासाठी उभ्या असल्याचे सरास पहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी याला आळा घालण्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे. या संदर्भात स्थानीक पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी सध्या बोलण्यास नकार दिला आहे .

VIDEO: रोड रोमिओच्या छेडछाडीत पोलीस होण्याचं स्वप्न भंगलं, विवाहित तरुणीसोबत पाहा काय घडलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here