मुंबई: गेल्या काही वर्षांपासून सायबर क्राईम वाढत आहे. वाढत्या इंटरनेटच्या वापरांमुळं लोकांचं आयुष्य तर अधिक सहज सोपं झालंय. पण, सोबतच यामुळं अनेक अडचणी देखील वाढल्या आहेत. अनेकदा नागरिकांना सायबर क्राईमसारख्या गोंष्टींबद्दल माहिती नसते. आणि त्याच्या नकळत ते सायबर क्राईमला बळी पडतात. यामुळं आतापर्यंत अनेकांना हजारोंचा फटका सहन करावा लागला आहे. यात आता सेलिब्रिटींची संख्या वाढत चालली आहे. मराठी सिनेसृष्टीतील एक अभिनेत्री नुकतीच सायबर क्राईमची शिकार झाली आहे.
…म्हणून विजू मानेंनी केलं नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांचं कौतुक
मराठी प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिला इंस्टाग्रामवर एका महिलेनं प्रमोशनल व्हिडिओसाठी १२ हजार रुपयांची ऑफर दिली होती. ‘तुमच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर फॉलोअर्स चांगले आहेत, इन्स्टाग्रामवर प्रमोट करण्यासाठी व्हिडिओ अपलोड करा.’ असं त्या महिलेकडून भाग्यश्रीला सांगलण्यात आलं होतं. त्यानुसार तिनं १२ हजार रुपये दिले होते. त्यानंतर या महिलेनं भाग्यश्रीला शेअर बाजाराच चांगला पैसा मिळेल म्हणून ७५ हजारांची गुंतवणूक करायला सांगितलं.


भाग्यश्रीनं काही हजारांची गुंतवणूक केली देखील केली. परंतु त्यानंतर समोरच्या महिलेनं उत्तर देणं बंद केलं. त्यामुळं आपली फसवणूक झाल्याचं भाग्यश्रीच्या लक्षात आलं.

सायबर फसवणूक झाल्याचं लक्षात येताच भाग्यश्रीनं आंबोली पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आयपीसी कलम ४१९, ४२० आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात अधिक तपास आंबोली पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here