पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता करणार देशाला संबोधित करणार असून आज लॉकडाउनच्या २१ व्या, अर्थात शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी काय बोलणार याची संपूर्ण देशाला उत्सुकता लागली आहे. देशव्यापी लॉकडाउनची यापुढील स्थिती काय असेल हे मोदी आज स्पष्ट करतील. दरम्यान, देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढत असून देशभरात रुग्णांची संख्या ९३५२ वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत भारतात ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे.

Live अपडेट्स…

>> गेल्या २४ तासांमध्ये देशभरात करोनाचे ९०२ नवे रुग्ण आढळले. तर, देशभरात रुग्णांची संख्या ९३५२ वर पोहोचली आहे. आतापर्यंत भारतात ३०८ जणांचा मृत्यू झाला आहे.

>> महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू आणि तेलंगण या राज्यांनी पंतप्रधानांना लॉकडाउन वाढवण्याची यापूर्वीच केली आहे विनंती केली आहे.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याची संपूर्ण देशाला उत्सुकता, आज मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा देशव्यापी लॉकडाउन संपत असून, आज मोदी लॉकडाउनचा दुसरा टप्पा जाहीर करतील का?… की लॉकडाउन संपला असे जाहीर करतील?… की टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथील करतील?, या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे थोड्या वेळाने मिळणार आहेत.

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता करणार देशाला संबोधित.

>> नमस्कार, मटा ऑनलाइनच्या या लाइव्ह अपडेट्समध्ये आपले स्वागत. देशभरातील आजची करोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी वाचत राहा लाइव्ह अपडेट्स…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here