मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात पुकारलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन आज संपत आहे. मात्र, गेल्या २१ दिवसांत करोनाचा संसर्ग म्हणावा तसा आटोक्यात आलेला नाही. महाराष्ट्रात दिवसागणिक रुग्णांचा आकडा वाढतोच आहे. काल दिवसभरात तब्बल ३५२ रुग्णांची वाढ झाली. एका दिवसातील हा उच्चांकी आकडा होता. जाणून घेऊन आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी…

लाइव्ह अपडेट्स:

>> अहमदनगर: कोपरगाव येथील करोना बाधित महिलेचा मृत्यू… जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांची माहिती

>> पुणे: मास्क न घातल्याबद्दल हटकणाऱ्या पोलिसांना मारहाण; चौघांवर खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वाचा:

>> नागपूर: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल बदनामीकारक फेसबुक पोस्ट लिहिल्याप्रकरणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्याविरोधात नागपूर ग्रामीणच्या कोंढाळी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नागपूर जिल्हाध्यक्ष आकाश गजबे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

>> राज्यातील रुग्णांचा आकडा २३३४ वर, आतापर्यंत २२९ जणांना डिस्चार्ज

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here