Dharamveer movie | काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही चित्रपटगृहात जाऊन ‘धर्मवीर’ चित्रपट (Dharmveer Movie) पाहिला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी या चित्रपटातील शेवट पाहणे टाळले होते. या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने १० कोटी रुपयांच्या कमाईचा आकडा पार केला आहे. आगामी काळात कमाईचा आकडा आणखी वाढेल.

हायलाइट्स:
- चित्रपटगृहात राजन विचारे आणि प्रताप सरनाईक उपस्थित होते
- हा चित्रपट सुरु असताना त्यांना डुलकी लागली
- ही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत
‘धर्मवीर’ चा हा विशेष शो आयोजित करण्यात आला होता त्यावेळी चित्रपटगृहात राजन विचारे आणि प्रताप सरनाईक उपस्थित होते. मात्र, हा चित्रपट सुरु असताना त्यांना डुलकी लागली. त्यांची ही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ‘धर्मवीर’ चित्रपट उघड्या डोळ्यांनी पाहताना दिघे साहेबांवर प्रचंड प्रेम असलेले शिवसेनेचे महान नेते मंडळी! असे कॅप्शन या छायाचित्रांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी (MNS)संबंधित एका फेसबुक पेजवरून ही छायाचित्रं पोस्ट करण्यात आली. त्यानंतर ही छायाचित्रं वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाली. या सगळ्या गदारोळानंतर अद्याप राजन विचारे आणि प्रताप सरनाईक यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, यानिमित्ताने शिवसेनेच्या नेत्यांनी टीका करण्यासाठी मनसेच्या हाती आयते कोलीत दिले आहे.
उद्धव ठाकरे ‘धर्मवीर’ चित्रपटाचा शेवट न पाहताच चित्रपटगृहातून बाहेर पडले
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही चित्रपटगृहात जाऊन ‘धर्मवीर’ चित्रपट (Dharmveer Movie) पाहिला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी या चित्रपटातील शेवट पाहणे टाळले होते. मिलिंद नार्वेकर यांच्या घरगुती गणपतीचे दर्शन घेऊन आनंद दिघे ठाण्यात परततात. चित्रपटातील हा प्रसंग संपताच उद्धव ठाकरे हे थिएटरमधून बाहेर पडले होते. शेवटच्या प्रसंगात आनंद दिघे यांच्या मृत्यूचा प्रसंग असल्याने आपण शेवट पाहणे टाळले, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : shivsena leader rajan vichare and pratap sarnaik sleeping during anand dighe dharamveer movie show
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network