Raj Thackeray Ayodya Visit |पुण्यात २२ मे रोजी होणाऱ्या सभेनंतर राज ठाकरे डॉक्टरांचा पुन्हा सल्ला घेणार आहेत. या सल्ल्यानुसार अयोध्या दौऱ्यासंदर्भातील पुढील आखणी केली जाईल. मात्र, तुर्तास हा दौरा स्थगित झाला आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनीही कडाडून विरोध केला होता. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांचा अपमान केला होता. यासाठी ते माफी मागत नाहीत, तोपर्यंत राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही, अशी गर्जना बृजभूषण सिंह यांनी केली होती.

 

Raj Thacekray tweet Ayodhya
राज ठाकरेंचं ट्विट

हायलाइट्स:

  • पुण्यात २२ मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे
  • राज ठाकरे मनसैनिकांसमोर याबाबत स्पष्टीकरण देतील
मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगिती झाल्याच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. आज सकाळपासून अयोध्या दौरा रद्द होणार असल्याची जोरदार चर्चा होती. अखेर राज ठाकरे यांनी स्वत: ट्विट करत तूर्तास अयोध्या दौरा (Raj Thackeray Ayodhya Visit) स्थगित करत असल्याचे स्पष्ट केले. दौरा रद्द करण्यामागील कारण राज ठाकरे यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. पुण्यात २२ मे रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी राज ठाकरे मनसैनिकांसमोर याबाबत स्पष्टीकरण देतील. पुण्याच्या गणेश कला क्रीडा केंद्राच्या सभागृहात रविवारी सकाळी १० वाजता राज ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी राज ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : mns chief raj thackeray tweet about ayodhya visit postponed
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here