Raj Thackeray | शरयू नदीच्या काठावर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्लॅन मनसेने आखला होता. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांना अयोध्येत जाण्यासाठी १० एक्स्प्रेस रेल्वेगाड्या बूक करण्यासंदर्भातही बोलणी सुरु होती. मात्र, आता राज ठाकरे यांनीच प्रकृतीच्या कारणास्तव बॅकआऊट केल्याने मनसैनिकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. राज ठाकरे २२ मे रोजी पुण्यातील सभेत मनसैनिकांवर भूमिका मांडलीत.

 

Raj 1

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

हायलाइट्स:

  • राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा होता
  • मनसेने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार हवा केली होती
मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा बहुचर्चित अयोध्या दौरा अचानकपणे स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे हे ५ जून रोजी अयोध्येत जाणार होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे यांनी तूर्तास माघार घेतल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा अजेंडा हातात घेऊन वाटचाल सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे मनसेने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जोरदार हवा केली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांना अयोध्येत जाण्यासाठी १० एक्स्प्रेस रेल्वेगाड्या बूक करण्यात आल्या होत्या. मात्र, आता हा दौराच लांबणीवर पडल्याने सोशल मीडियावर सध्या मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे.

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर सोशल मीडियावरील प्रतिक्रिया खालीलप्रमाणे

  • मोठा धक्का दिलाय साहेबांनी ब्रिजभूषण सिंहला. एका झटक्यात त्यांच्या सर्व प्लॅनिंगवर पाणी फेरले. त्यांनी साहेबांना अडवण्यासाठी केलेली तयारी, त्याचा खर्च सगळं वाया गेलं.साहेब आहेतच ग्रेट. मास्टरस्ट्रोक, जिंदाबाद.
  • घेतलेला निर्णय,बोललेला शब्द कधीही मागे न घेणारे आम्हा शिवसैनिकांचे दैवत हिंदुह्रदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे……शब्द म्हणजे शब्द

  • रावण लाख वाईट होता पण तिथल्या भय्यांना घाबरून अयोध्या दौरा कधी रद्द केला नव्हता

  • गनिमी कावा करून वेशांतर करून राम भगवान चे दर्शन घ्या

  • शेर जब दो कदम पीछे लेता है तो वह भागने के लिए नहीं बल्कि झपटने के लिए तैयार होता है। आली रे आली आता बृजभूषणची बारी आली…!

  • केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र पेटवू या बॅनर वर खर्च केलेला पैसा वाया गेला तर

  • ते रेल्वेची तिकिटं बुक केली होती ती सर्व भैय्यांना मोफत देऊन टाका साहेब, तेवढेच आशीर्वाद भेटतील

  • साहेबांच्या तब्येतीचा विचार करता पक्षाची सूत्रे संदीप देशीपांडे यांच्या हाती द्याची हीच योग्य वेळ आहे आता एकच नेता आहे जो पळून जाणार नाही आणि माघार हि घेणार नाही..
Raj 1

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : funny comments an memes on social media after mns raj thackeray announced ayodhya visit postponed
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here