बीड : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होता असताना बीडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. कारण, इथं विवाहित महिलेने चक्क तीन प्रियकरांच्या मदतीने आपल्या पतीचा खून केल्याचा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये अनैतिक संबंधसाठी पत्नीसह सख्खा पुतण्या, भाचा आणि अन्य एकाने विवाहितेच्या पतीचा खुनाचा कट रचला. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच तीन प्रियकरांच्या मदतीने त्याच्या शरीराचे दोन तुकडे केले आणि वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. या घटनेच्या तब्बल ९ महिन्यानंतर पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

आळंदीत वाढतोय वेश्या व्यवसाय, संतापलेल्या नागरिकांकडून ठिय्या आंदोलन

नऊ महिन्यांनी केला उलगडा

बीडच्या माजलगाव तालुक्यातील बाभळगाव इथले दिगंबर गाडेकर हे सप्टेंबर २०२१ पासून गायब होते. ते बेपत्ता असल्याची नोंदही पोलिसांत करण्यात आली होती. ११ मे रोजी शेलगाव थडी शिवारात एका विहिरीत एका अज्ञात व्यक्तीचा कंबरेखालचा भाग आढळून आला. पोलिसांना याची माहिती मिळताच कसून तपास सुरू झाला. यावेळी अर्धवट असेल्या मृतदेहाच्या खिशात काही महिलांचे आधारकार्ड सापडले. पोलिसांनी संबंधित महिलांशी चर्चा केली असता त्यांनी आधारकार्ड दिगंबर गाडेकर यांना दिले असल्याची माहिती समोर आली.

यानंतर पोलिसांनी नातेवाईकांची चौकशी केली आणि तपास केला असता हा खूनाचा धक्कादायक प्रकार समोर आला. गाडेकर यांचा पुतण्या गणेश गाडेकर, भाचा सोपान मोरे आणि बाबासाहेब घोगाने या तिघांनी मिळून त्यांचा खून केला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. या तिघांचेही मयताच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे हा कट रचल्याचं त्यांनी पोलिसांत कबूल केलं आहे.

आज तुमचे दिवस…उद्या आमचे येतील; जामीन मिळाल्यावर संदीप देशपांडेंचा सरकारला इशारा
दरम्यान, या घटनेमध्ये आरोपी पत्नी फरार असल्याची माहिती आहे. तर पोलीस तिचा शोध घेत असून गाडेकर यांचा अर्धा मृतदेह कुठे फेकला? याचाही पोलीस तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

२९४ कबरी आणि ३ हजार दागिन्यांचे रहस्य; प्राचीन कबरस्थानात सापडला खजिना, पाहा Photos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here