ठाणे: ‘घरात बसण्याचं दु:ख काय असतं हे मला चांगलं माहीत आहे. मात्र, डॉक्टरी सल्ल्यानुसार मला १४ दिवस ‘होम क्वारंटाइन’ राहावं लागणार आहे. १४ दिवसांनंतर मी परत तुमच्या सेवेत येईन,’ अशा शब्दांत राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेला आश्वस्त केलं आहे.

वाचा:

करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्यानंतर आव्हाड यांनी सोमवारपासून स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतलं आहे. ‘क्वारंटाइन’ झाल्यानंतर एक व्हिडिओ ट्विट करून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘मी स्वत:ची ‘कोविड १९’ टेस्ट करून घेतली आहे. सुदैवानं ती टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून मी स्वत:ला होम क्वारंटाइन करून घेतलंय, असं त्यांनी यात म्हटलंय.

वाचा:

‘क्वारंटाइन नसताना मी स्वत:च्या निरीक्षणाखाली जवळपास ८० हजार लोकांना रोज अन्नाची पाकिटं वाटायचो. इतर सोयीसुविधा द्यायचो. आता मला ते करता येणार नाही. या कामाला आता कुठं तरी खीळ बसेल असं वाटतंय. पण कुणीही उपाशी राहता कामा नये ही जी शपथ आपण घेतलीय, ती पूर्ण केली पाहिजे. हे काम असंच सुरू राहिलं पाहिजे, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलंय.

वाचा:

‘घरी बसा. सुरक्षित राहा, असं आवाहनही त्यांनी सर्वांना केलंय. ‘मी बाहेर पडायचो. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलो म्हणून आता घरी बसावं लागतंय. त्यामुळं तुम्ही काळजी घ्या. मी घरी बसल्यामुळं ज्यांना माझ्याकडून अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करू शकणार नाही. त्याबद्दल माफी मागतो. पण लवकरच आणखी चाचणी करणार आहे. ती सुद्धा निगेटिव्ह येईल आणि मी परत एकदा तुमच्यामध्ये येईन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here