मुंबई: मनोरंजनविश्वात सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा आहे. यंदा या महोत्सवाचं ७५वं वर्ष आहे. या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात काही भारतीय कलाकारांचीही वर्णी लागत असते. यातच आपल्या एका मराठमोळ्या अभिनेत्याचंही नाव घेतलं जातंय.

अभिनेता आदिनाथ कोठारे कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी नुकताच रवाना झाला आहे. या मोठ्या मंचावर तो नेमका काय करणार आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण तरी तो तिथल्या काही उपक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचं समजतं.
आई झाल्यानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती अभिनेत्री, फोटो शेअर करत म्हणाली…


कान फिल्म फेस्टिव्हल अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. त्यामुळे आदिनाथचं तिथे जाणं हीदेखील अभिमानाची गोष्ट असल्याचं बोललं जातंय. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ या सिनेमातील त्याच्या कामामुळे त्याचं प्रचंड कौतुक झालं. बऱ्याच वर्षांनी आदिनाथला मराठी सिनेमात दमदार भूमिकेत बघितल्यामुळे चाहतेही खुश झाले. आता तो ‘कान’मध्येही सहभागी होतोय. त्यामुळे त्याला मिळत असलेल्या यशाचा आनंद आदिनाथइतकाच त्याच्या चाहत्यांनाही आहे.
‘धर्मवीर’साठी प्रसादला नव्हे तर या दिग्दर्शकाला होती पहिली पसंती , प्रविण तरडेंचा खुलासा
युट्यूब चॅनेल
आदिनाथनं आता स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरू केलंय. आपल्या चाहत्यांना तो सांगतोय की ‘मी काही नवं सुरू करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं. माझ्या जगतातल्या अनेक घडामोडी मी तुम्हाला इथे सांगेन.’ ‘मी एका मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे. पण अजून बऱ्याच गोष्टी आहेत. ज्या मी काही दिवसांनी सांगेन.’ आदिनाथच्या समोर आता भरपूर वेगवेगळं काम आहे. या आपल्या कामाबद्दलचीच माहिती तो त्याच्या युट्यूब चॅनेलवर देणार आहे’,असंही तो म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here