एसटीच्या केवळ दोन फेऱ्या धावत असल्याने रोजगारासाठी तसेच शाळा-महाविद्यालयासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक विद्यार्थ्यांना शाळेसाठी रोजचा टॅक्सीखर्च परवडत नसल्याने कुटुंबे माथेरान सोडून कर्जत तसेच नेरळ येथे स्थायिक होत आहेत. यामुळे माथेरानची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. स्थानिकांना परवडणाऱ्या दरात आणि आरामदायी सेवा मिळावी यासाठी माथेरान परिवहन सेवा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

माथेरानच्या राणीचे टाइम टेबल
माथेरानच्या हातरिक्षा होणार इतिहास जमा, आता फिरा ई-रिक्षाने
पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा मिळणार
करोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर सेवा आणि आदरातिथ्य क्षेत्राच्या वाढीसाठी मोठा वाव आहे. हे लक्षात घेऊन राज्यातील पाच पर्यटनस्थळांवर पर्यटकांना दर्जेदार निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी उद्योजकांबरोबर करार करण्यात आला आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी दिली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील शासकीय जमिनींचा खासगीकरणाच्या माध्यमातून पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या अंतर्गत महाबळेश्वर, माथेरान, मीठबाव, हरिहरेश्वर आणि ताडोबा येथे निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी विकासकांना सवलतीचे करारपत्र देण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.