तरुणाची चौकशी केली असता त्याच्याकडे २०० रुपये दराच्या तीन नोटा सापडल्या. त्यात एक नोट बनावट तर दोन नोटा या चलनातील खऱ्या नोटा होत्या. नकली नोटेबाबत सुरुवातीला तरुणाने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, खाकीचा हिसका दाखवताच रंगीत प्रिंटरवर कलर झेरॉक्स नोटा तयार करुन त्या मार्केटमध्ये देत असल्याची कबूली त्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी तरुणाच्या हिंगणे येथील घरी जावून झडती घेवून नोटा बनविण्यासाठी तरुण वापरत असलेले प्रिंटर, २०० रुपयांच्या ४५ नोटा बनावट नोटा, व नोटा बनविण्यासाठीचे कागद असा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने काही पाचशे रुपयांच्या नोटा बनविल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत.
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे , अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस स्टेशने पोलीस निरिक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरिक्षक अमोल गर्जे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विनय सानप, ज्ञानेश्वर ढाकरे, ईश्वर देशमुख, गोपाल माळी यांनी ही कारवाई केली आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.