मुंबई : चेन्नई सुपर किंग्सचा संघ यावर्षीचा आपला अखेरचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज खेळत आहे. चेन्नईच्या या अखेरच्या सामन्यात आता कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आता मोठा गौप्यस्फोट केला आहे. आयपीएलबाबत धोनीने आता एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

धोनीने आयपीएलबाबत कोणता मोठा निर्णय घेतला, पाहा…धोनी यावर्षी अखेरची आयपीएल खेळणार असल्याचे समोर आले होते. त्यासाठी चेन्नईच्या संघाने रवींद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. पण काही सामने झाल्यावर त्याला चेन्नईचे कर्णधारपद सोडावे लागले. कर्णधारपद सोडल्यावर जडेजा काही दिवसांनी संघाबाहेर गेला होता. त्यामुळे चेन्नईच्या संघाचे नेतृत्व पुन्हा धोनीकडे आला होते. त्यामुळे आता पुढच्या वर्षी चेन्नईचे कर्णधारपद कोणाकडे सोपवणार, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित राहिला होता. पण आजच्या चेन्नईच्या अखेरच्या सामन्यात मात्र धोनीने मोठी घोषणा केली आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनी जेव्हा टॉससाठी आला तेव्हा त्याने एक विधान करत सर्वांनाच धक्का दिला. यावेळी धोनी म्हणाला की, ” मी जर अखेरचा सामना चेन्नईत खेळलो नाही तर ते चाहत्यांसाठी योग्य ठरणार नाही. चेन्नईच्या चाहत्यांनी अमाप प्रेम मला दिले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरच मी आयपीएलचा अखेरचा सामना खेळणार आहे. कारण अखेरचा सामना खेळताना मला त्यांचे धन्यवाद मानायचे आहेत. त्यामुळे आयपीएलचा माझा अखेरचा सामना हा चेन्नईत होईल.” धोनीने ही गोष्ट सांगत असताना आपण कधीपर्यंत आयपीएल खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कारण आज चेन्नईचा या मोसमातील अखेरचा सामना आहे आणि तो मुंबईत खेळवला जात आहे. त्यामुळे आता धोनीला पुढच्या हंगामाची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे धोनी आता पुढच्या हंगामातही चेन्नईच्या संघाकडून खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण धोनी पुढच्या वर्षी संघात असला तरी तो कर्णधार असेल की नाही, याबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे धोनी पुढच्या वर्षीही आयपीएल खेळणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here