रत्नागिरी: कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा एकीकडे करोनामुक्त झालेला असताना लगतच्या रत्नागिरी जिल्ह्यात मात्र करोनाच्या रुग्णांमध्ये नव्याने भर पडत चालली आहे. रत्नागिरीतील साखरतर भागातील एका ६ महिन्यांच्या बाळाला करोनाची लागण झाल्याने सारेच हादरले आहेत.

रत्नागिरीतील साखरतर भाग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. लहानग्याला करोनाची लागण झाल्याने या भागातील हा तिसरा रुग्ण ठरला आहे. रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमधून करोना सदृष्य लक्षणे असलेल्या १०० रुग्णांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील या लहानग्याचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी माहिती देताना सांगितले की, हे बाळ सहा महिन्यांचे आहे. साखरतर भागातील करोनाग्रस्त महिलेच्या नातेवाईकांचं हे बाळ आहे. या बाळाची प्रकृती सध्या स्थिर असून बालरोग तज्ज्ञ बाळाची काळजी घेत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.

दरम्यान, जिल्ह्यातील करोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात करोनाचे सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी चौघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुबईतून खेडमध्ये आलेल्या एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here