नवज्योत सिंग सिद्धू यांनी जेव्हा रसगुल्ल्यासाठी मनोज प्रभाकरच्या कानशिलात लगावली होती;वादाचं जुनं
यावेळी राजनाथसिंह म्हणाले की, करोना आपत्तीनंतर आरोग्य क्षेत्राचे महत्त्व आणि या क्षेत्राबद्दलचा जगभरातील आदर वाढला आहे. आरोग्य, निरोगीपणा याला आपल्या संस्कृतीत प्राधान्य देण्यात आले आहे. शरीरासोबतच मनस्वास्थ्य देखील महत्त्वाचे आहे. सुख-दुःखात, लाभ-तोट्यात, विजय-पराजयात स्थितप्रज्ञ राहणे खूप महत्वाचे आहे. महात्मा गांधी म्हणाले होते की, भारतात धर्माचा ऱ्हास होतो आहे. याचा अर्थ लोकांनी सतत देवळात जाऊन आरत्या कराव्यात किंवा मशिदीत जाऊन बसावे असे त्यांना अभिप्रेत नव्हते. समाज व राष्ट्राप्रती दायित्व आणि नैतिकता हा धर्म गांधीजींना अपेक्षित होता. न्याय हे इंग्लंडचे, उदारमतवाद हे फ्रान्सचे तर धर्म हे भारताचे राष्ट्र वैशिष्ट्य असल्याचे विवेकानंद सांगत. त्यामुळे सुशिक्षित तरुणांनी राष्ट्राचा विचार केला पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
वैद्यकीय क्षेत्रातले उच्च शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला जगाची दारं खुली आहेत. तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा मात्र देशाचा विसर पडू देऊ नका. तुमच्या आजवरच्या वाटचालीत ज्यांना तुम्ही कदाचित ओळखतही नाही अशा देशातल्या शेतकऱ्यांपासून मजूरापर्यंतच्या लहानसहान प्रत्येक घटकाचा वाटा आहे. त्यांच्या त्यागाची, बलिदानाची किंमत पैसे देऊन चुकवता येणार नाही. त्यामुळे या पुढच्या आयुष्यात लोकांशी स्नेहाने वागा, त्यांचा आदर करा, त्यांची सेवा करा. आपण चांगले डॉक्टर तर बनालच पण त्यापेक्षा अधिक चांगले माणूस व्हा, असे आवाहन देखील राजनाथसिंह यांनी यावेळी केले.