नाशिकरोड : किराणा दुकानाबाहेर भेटलेल्या युवकाला त्याच्या गणवेशावरून चोरट्याने मला नोकरीची गरज आहे असे म्हणत विश्वास संपादन केला. त्या युवकासोबत घरी जाऊन दुचाकीची चावी घेऊन गाडी चोरून नेली. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महेंद्र रतन सोनवणे (चंद्रप्रकाश सोसायटी, खोडदेनगर, टाकळी) हे शुक्रवारी (दि. १३) सकाळी रामदास स्वामीनगर येथील किराणा दुकानात सामान घेण्यासाठी गेले होते. यावेळी दुकानाबाहेर उभ्या असलेल्या अनोळखी युवकाने सोनवणे यांच्या गणवेशावरून कुठे काम करतात, अशी विचारणा केली. मला नोकरीची गरज आहे, मला सर्व प्रकारची वाहने चालविता येतात, असे म्हणून आपल्याजवळील परवाना व इतर कागदपत्रे दाखवली. त्यांनी एकमेकाचे मोबाइल नंबर दिल्यावर सोनवणे यांनी मी ब्लड बँकेत कामाला असून तेथे नोकरीची जागा आहे, असे सांगितले. त्यानंतर सोनवणे यांच्याबरोबर अनोळखी युवक त्यांच्या घरी गेला. सोनवणे घरात फ्रेश होण्यास गेले असता युवकाने त्यांच्या दुचाकीची चावी घेऊन गाडी चोरून नेली. सोनवणे बाहेर आले असता त्यांना युवक व गाडी दिसली नाही. चोरट्याने दुचाकी चोरण्यासाठी लढवलेली शक्कल पोलिसांनाही अचंबित करणारी ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here