देहरादून: उत्तराखंडच्या उधम सिंह नगर जिल्ह्यातील बाझपूरमध्ये एक अजब घटना घडली आहे. एक २२ वर्षांचा तरुण त्याच्या सावत्र आईसोबत पळून गेला आहे. अकरा वर्षांपूर्वी व्यक्तीच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यानं दुसरा विवाह केला. त्यानंतर आता त्या व्यक्तीला पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा त्याच्याच सावत्र आईसोबत पळून गेला आहे. दोघांनी विवाहदेखील केला आहे. या प्रकरणी वडिलांनी मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

जिवंत शेतकऱ्याला मृत दाखवून अनुदान केलं बंद; प्रशासनातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर
पळून जाऊन लग्न करणाऱ्या दोघांनी नेमका कोणता कायदा मोडला आहे, ते पोलीस तपासून पाहत आहेत. पळून गेलेल्या मुलाचे वडील रोजंदारीवर मजुरी करतात. माझ्या मुलानं माझ्यावर हल्ला केला आणि पत्नीनं घरी परतण्यास नकार दिला, असा आरोप पतीनं केला. माझी पत्नी मुलीलादेखील सोबत घेऊन आली. घरातील २० हजार रुपयेदेखील ती घेऊन गेली, असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

बन्नाखेरा पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेल्या अर्जुन गिरींनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. वडिलांनी जवळपास १० वर्षांपूर्वी दुसरं लग्न केल्यावर दोघांनीदेखील घरं सोडलं. यापैकी लहान मुलगा गेल्या काही वर्षांपासून वडिलांच्या घरी येऊन जाऊन असायचा.

मोठी बातमी : राणा दाम्पत्याने नोटिशीला दिलेलं उत्तर अमान्य; घरावर चालणार BMCचा हातोडा
११ मे रोजी तक्रारदाराची पत्नी वडिलांच्या घरी जात असल्याचं सांगून निघाली. मात्र ती परत आलीच नाही. पत्नीनं आपल्याच मुलासोबत विवाह केल्याचं आणि ते एकत्र राहत असल्याचं तक्रारदाराला समजलं. लग्न केलेल्या दोघांना पोलिसांनी चौकशीला बोलावलं आहे. दोघांनी कोणताही कायदा मोडला असल्याचं लक्षात आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here