गोवा : दक्षिण गोव्यातील वेल्साव समुद्रकिनारी गुरुवारी दुपारी एका १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दिया नाईक असं पीडितेचं नाव असून तिच्या मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर धारदार वस्तूने वार केलेल्या अनेक जखमा आढळून आल्या आहेत.

अधिक माहितीनुसार, दिया ही मूळची नवीन वड्डेमची रहिवासी असून बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह वेल्साव येथील दांडो समुद्रकिनारी झुडपात पडलेला आढळून आला. दियाच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या मुलीला बुधवारी दुपारी शेवटचं पाहिलं होतं. जेव्हा ती दुपारच्या जेवणानंतर कुटुंबाच्या किराणा दुकानात आली होती.

महत्त्वाची बातमी! …म्हणून ३१ मे रोजी देशभरात रेल्वे धावणार नाही?, वाचा सविस्तर
इतकंच नाहीतर यावेळी त्यांनी दियाचं किशन कलंगुटकर याच्यासोबत रिलेशनशिप असल्याचीही माहिती दिली. पण त्या दोघांमध्ये सध्या नातं नव्हतं असाही खुलासा त्यांनी पोलिसांजवळ केला. त्याआधारे पोलिसांनी कलंगुटकरचा वास्को इथं माग काढला आणि त्याला गुरुवारी अटक करण्यात आली.

या तपासात पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी यांसंबंधी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगतिलं की, आरोपीचं महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणीवर प्रेम होते आणि बुधवारी तिच्यासोबत तो समुद्रकिनारी फिरायला गेला होता. यावेळी तुझ्यासोबत संबंध ठेवायचे नाहीत, असं तिने सांगितल्यानंतर आरोपी तिच्यावर नाराज होता. याच नैराश्यातून त्याने तिच्यावर अनेक वेळा चाकूने वार केले आणि तिला जागीच ठार केले.

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यानंतर आरोपीने पीडितेचा मृतदेह समुद्रकिनारी असलेल्या झुडपात फेकून दिला. मृतदेह सापडल्यानंतर वास्को पोलिसांनी तपास सुरू केला आणि २४ तासांत आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

युट्यूबवर पाहून तरुणाने घरीच छापल्या नकली नोटा; प्रात्यक्षिक VIDEO पाहून पोलिसही चक्रावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here