सोलापूर : सुत्राने दिलेल्या माहितीच्या आधारे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत तब्बल एक कोटी रुपयांचा गुटखा पकडला आहे. कर्नाटकातल्या विजयपुराहून तुळजापूर-मराठवाड्याच्या दिशेने दोन भल्यामोठ्या कंटेनरमधून या गुटख्याची वाहतूक सुरु होती. या कारवाईत पोलिसांनी दोन कंटेनरसह गुटख्याची ९३० पोती जप्त केली आहेत. तालुका पोलिसांनी पाकणी पाटी येथे छापा टाकून ही मोठी कारवाई केली आहे.

प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांना उत्तर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाकणी येथे पेट्रोलिंग सुरु असताना गोपनीय बातमीदारमार्फत तेरामैल मंद्रुप येथुन तुळजापूर मार्गावर दोन कंटेनर गुटखा येणार असल्याची माहिती मिळाली. तेव्हा तालुका पोलिसांच्या डीबी पथकाने सापळा रचला असता त्यात कंटेनर क्रमांक एम.एच. ४६ ए.एफ. ६११७ व एच.आर. ३८-एक्स. ८०५१ ही वाहने पाकणी येथील वासुदेव हॉटेलजवळ पकडली. त्यावेळी चालकास सदर कंन्टेनरमध्ये काय आहे याबाबत विचारले असता त्यांनी सुरुवातीस उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यावर पोलीसांनी पाहणी केली असता त्या मध्ये पांढ-या रंगाच्या पोत्यांमध्ये गुटखासदृष्य (तंबायुक्त पदार्थ) माल भरलेला आढळला.

प्रेमाचा खून! १९ वर्षीय तरुणीची गोव्याच्या किनारी निर्घृण हत्या, प्रियकराने केला धक्कादायक खुलासा
त्यानंतर सदरचे दोन्ही कंटेनर सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे लावण्यात आले. त्यामध्ये असलेल्या मालाची पाहणी केली असता त्यात ११२२ हिरा पान मसाला, रॉयल ७१७ ७० पोती (प्रत्येकी ११० पाकीट) ३५ पोती (प्रत्येकी २२० पाकीट), ३४४ तंबाखू हिरा पान मसाला असा ३०० पोती (प्रत्येकी १०० पाकीट), रॉयल ७१७ १५० पोती (प्रत्येकी २०० पाकीट), ८५६७ तंबाखू हिरा पान मसाला, रॉयल ७१७, तंबाखू हिरा पान मसाला, रॉयल ७१७,२०० पोती (प्रत्येकी १०० पाकीट) १०० पोती (प्रत्येकी २०० पाकीट) अशी एकूण बाजारातील किंमत १ कोटी ४५ लाख ७४ हजार रुपये किंमतीचा गुटखासदृष्य माल आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत. पुढील कारवाई करण्यासाठी अन्न व प्रशासन विभाग सोलापूर यांना कळविले आहे. पुढील तपास सुरु आहे.

सुनील गावस्करांना समालोचक पदावरून काढून टाका; पाहा काय म्हणाले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here