बीड: जिल्ह्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने दोन दिवसापासून हजेरी लावली आहे. यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्याचं होत्याच नव्हत झालं आहे. काही ठिकाणी शेतात काढणीला आलेला कांदा भिजला आहे तर काही ठिकाणी काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. यामुळं शेतकऱ्याचं मोठ नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यामुळे आंबे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात कडा, डोंगरगण, दादेगाव, घाटपिंपरी, धामणगाव परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली. कांद्यासाठी केलेला खर्च निघेल की नाही? अशी चिंताच आता त्यांना सतावत आहे.

एका शेतकऱ्याने आमच्या प्रतिनिधीजवळ त्याची व्यथा मांडली आहे. भिवाजी पवार या शेतकऱ्याने तीन एकरवर कांदा लावला होता. काढणीला कांदा आला असतानाच अवकाळी पाऊस झाल्याने कांदा शेतातच सडू लागला आहे. त्यातच कांदा काढण्यासाठी मजूर देखील मिळत नाही व कांद्याला भाव देखील नाही. यामुळे केलेला खर्च देखील निघेल कि नाही? अशी चिंता भिवाजी पवार यांना सतावत आहे.

”अटी घालून शिवसेनेकडून संभाजीराजेंचा गेम करण्याचा प्रयत्न तर नाही ना?”
शेतातील कांदा काढण्यासाठी लावलेल्या मजुरांना देण्यासाठी पैसे देखील नाहीत, काय करावे? हा प्रश्न देखील त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे. कांदा लावून आमचं वाटोळ झालं असं म्हणत पवार यांच्या पत्नीने देखील सांगितले. अशीच काही परिस्थिती इतरही शेतकऱ्यांची आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करावी. अशी मागणी होत आहे

तुझं नाव मोहम्मद आहे का? आधार कार्ड दाखव! वृद्धाला बेदम मारहाण; मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here