पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर आज ( शनिवारी) कामशेत जवळ असणाऱ्या बोगद्यात एका बसचा टायर फुटला होता. त्यामुळे मुंबईच्या दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे बोगद्यापासून दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीसांनी क्रेनच्या सहायाने वाहने दूर करण्यात येत आहे. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर रस्ता रिकामा करून वाहतूक सुरळीत केली आहे. मात्र, याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. आज शनिवार असल्याने वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर असतात. त्यातच अचानक बसचा टायर फुटल्याने वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले.