Vasnat More | आम्ही राज ठाकरे यांच्या सभेची तयारी करत असताना कुठूनतरी एक बातमी आली. निलेश माझीरे हे वसंत मोरे यांच्या २० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. ही बातमी कोणी पसरवली माहिती नाही. मात्र, त्यानंतर एका झटक्यात निलेश माझीरे यांच्याकडून माथाडी कामगार सेनेचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले.

हायलाइट्स:
- वसंत मोरे आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस सुरु आहे
- मनसेतील एका गटाकडून वसंत मोरे यांना सातत्याने डावलले जात आहे
वसंत मोरे यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री कात्रज परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली, हे माहिती नाही. मात्र, पुणे मनसेतील अंतर्गत राजकारणाचे पडसाद आज राज ठाकरे यांच्या सभेवेळी उमटणार का, हे पाहावे लागेल. मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे पुणे शहराध्यक्ष यांच्याविषयी पसरवण्यात आलेल्या अफवांमुळे वसंत मोरे चांगलेच संतापले. आम्ही राज ठाकरे यांच्या सभेची तयारी करत असताना कुठूनतरी एक बातमी आली. निलेश माझीरे हे वसंत मोरे यांच्या २० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. ही बातमी कोणी पसरवली माहिती नाही. मात्र, त्यानंतर एका झटक्यात निलेश माझीरे यांच्याकडून माथाडी कामगार सेनेचे अध्यक्षपद काढून घेण्यात आले. त्यांच्याजागी दुसरा पदाधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरु झाल्या. नव्या अध्यक्षाला तातडीने मुंबईला पाठवण्यात आले.निलेश माझीरे यांच्यावर कारवाई करण्याची इतकी घाई कोणाला झाली होती, असा सवाल वसंत मोरे यांनी विचारला. वसंत मोरे यांच्या या आरोपांचा रोख नेमका कोणाच्या दिशेने आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, राज ठाकरे यांच्या सभेवेळी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे आणि मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस सुरु आहे. मनसेतील एका गटाकडून वसंत मोरे यांना सातत्याने डावलले जात आहे. त्यामुळे संतापलेल्या वसंत मोरे यांनी राज ठाकरे आल्याशिवाय मनसेच्या शहर कार्यालयात जाणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे हे वसंत मोरे यांच्याशी चर्चा करणार होते. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकली नव्हती. त्यामुळे आता मनसेतील हा वाद कोणत्या दिशेने जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : vasnat more slams mns leaders before raj thackeray rally in pune
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network