पुणे: अवघ्या काही दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून शड्डू ठोकणाऱ्या संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना पाठिंबा जाहीर करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या भूमिकेवरून घुमजाव केले आहे. राज्यसभा निवडणुकीत एका जागेवर आमचा उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यानंतर उरलेली अतिरिक्त मते ही आम्ही शिवसेनेलाच देऊ, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केले आहे. ते शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

यावेळी शरद पवार यांना राज्यसभा निवडणुकीत तुम्ही कोणाला पाठिंबा देणार, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, राज्यसभेच्या जागेसंदर्भात आमच्या पक्षापुरता आमचा निर्णय झाला आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुका झाल्या तेव्हा आमची एकच जागा निवडून येत होती. त्यावेळी दुसरी जागा निवडून आणण्यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही विनंती मान्य केल्यामुळे मी आणि फौजिया खान राज्यसभेवर निवडून गेलो होतो. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक मते शिवसेना उमेदवाराशिवाय दुसऱ्या कोणाला देता येणार नाहीत. शिवसेना जे नाव राज्यसभा निवडणुकीसाठी देईल, त्यांना आम्ही शिल्लक मतं देऊ. मग तो उमेदवार संभाजीराजे छत्रपती किंवा आणखी कोणीही असो, असे शरद पवार यांनी सांगितले.
ब्राह्मण समाज आरक्षणाच्या सूत्रात बसत नाही: शरद पवार

शरद पवार यापूर्वी नेमकं काय म्हणाले होते?

शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देण्यासंदर्भात भूमिका घेतली होती. आमचा एक उमेदवार निवडून येण्यात काहीही अडचण नाही. आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत संभाजीराजे यांना देऊ, असे शरद पवार यांनी म्हटले होते. मात्र, त्यानंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याचे ठरवले होते. एकतर संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा किंवा आम्ही आमचा उमेदवार रिंगणार उतरवू, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

छत्रपती संभाजी राजेंना शिवसेनेच्या विनायक राऊतांची ऑफर, म्हणाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here