Nilesh Rane | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा जाहीर केला होता. आमचा एक उमेदवार निवडून येण्यात काहीही अडचण नाही. आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत संभाजीराजे यांना देऊ, असे शरद पवार यांनी म्हटले होते. मात्र, आता शरद पवार यांनी घुमजाव करत शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

 

Sharad Pawar Nilesh Rane
शरद पवार आणि निलेश राणे

हायलाइट्स:

  • राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जूनला महाराष्ट्रात निवडणूक होत आहे
  • शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा जाहीर केला होता
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्धार केलेले संभाजीराजे छत्रपती यांचा पाठिंबा ऐनवेळी मागे घेतल्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हे होणारच होते. पवार साहेब आणि शब्द पाळला, असे होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब (Sharad Pawar) कसले?? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या सीटवर आहे ज्याने मराठा मुक मोर्चाची मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली होती, विसरू नका, अशा आशयाचे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा शिवसेनेला पाठिंबा, आता संभाजीराजे छत्रपतींचं काय?
राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जूनला महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. यामध्ये दोन जागांवर भाजप आणि प्रत्येकी एका जागेवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा उमेदवार निवडून येणे निश्चित आहे. मात्र, सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने चुरस निर्माण झाली आहे. या सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांना दावा सांगितला होता. त्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला सहकार्य करावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा जाहीर केला होता. आमचा एक उमेदवार निवडून येण्यात काहीही अडचण नाही. आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत संभाजीराजे यांना देऊ, असे शरद पवार यांनी म्हटले होते.
राजकीय नेता सोयीनं सभा घेतो, त्यावर काय भाष्य करायचं, मनसेच्या सभेवर शरद पवारांची प्रतिक्रिया
मात्र, शिवसेनेने सहाव्या जागेवर उमेदवार उतरवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शरद पवार यांची भूमिका ३६० अंशांनी बदलली. पुण्यातील पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनी ही बाब स्पष्ट केली. राज्यसभेच्या जागेसंदर्भात आमच्या पक्षापुरता आमचा निर्णय झाला आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुका झाल्या तेव्हा आमची एकच जागा निवडून येत होती. त्यावेळी दुसरी जागा निवडून आणण्यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही विनंती मान्य केल्यामुळे मी आणि फौजिया खान राज्यसभेवर निवडून गेलो होतो. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक मते शिवसेना उमेदवाराशिवाय दुसऱ्या कोणाला देता येणार नाहीत. शिवसेना जे नाव राज्यसभा निवडणुकीसाठी देईल, त्यांना आम्ही शिल्लक मतं देऊ. मग तो उमेदवार संभाजीराजे छत्रपती किंवा आणखी कोणीही असो, असे शरद पवार यांनी सांगितले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp leader nilesh rane slams ncp chief sharad pawar over supporting sambhajiraje in rajya sabha election
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here