गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या सुनावणीत एंबरने पहिल्यांदाच जॉनीला अनेकदा तिने थोबाडीत मारल्याचं कबूल केलं. अर्थात मी हे पाऊल माझ्या सुरक्षेसाठी उचललं आहे. जॉनीने माझ्यावर जे आरोप केले आहेत ज्यामध्ये मी त्याच्यावर हल्ला केला असा त्याचा दावा आहे तो चुकीचा आहे. आमच्यामध्ये झालेल्या भांडणात मी माझ्या बचावासाठी त्याला थोबाडीत मारली आहे असा मुद्दा एंबरने कोर्टात मांडला आहे. एंबर असंही म्ह्णाली, आमच्या भांडणात जॉनी बरेचदा हिंसक व्हायचा, त्यामुळे मला बचाव करण्यासाठी त्याच्यावर हात उचलावा लागायचा. जॉनीच्या वकीलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना एंबर म्ह्णाली की, मी आजवर कुणावरच विनाकारण हात उचललेला नाही किंवा हल्ला केलेला नाही. उलट जॉनीने मला मारहाण आणि शारीरीक शोषण केलं आहे.
एंबर आणि जॉनी द रम डायरी या सिनेमाच्या निमित्ताने भेटले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०१५ ला त्यांनी लग्न केलं तर २०१७ मध्ये ते एकमेकांशी पटत नसल्याने विभक्तही झाले. एंबरने जॉनीवर कौटंबिक अत्याचार करत असल्याचा आरोप केला. तर जॉनीने एंबरवर मानहानीचा दावा ठोकला आहे. जॉनीचं म्हणणं आहे की एंबरच्या चुकीच्या आरोपांमुळे त्याचं अभिनय करिअर धोक्यात आल्यानेच तिच्याविरोधात केस केली.
हॉलिवूडची अभिनेत्री एंबर हर्ड आणि हॉलिवूड स्टार जॉनी डेप यांची लव्हस्टोरी आणि त्यांच्या लग्नाची जितकी चर्चा झाली नाही इतकी चर्चा त्यांच्या घटस्फोटाची झाली होती. आणि आता ही जोडी पुन्हा चर्चेत आली आहे ती त्यांच्यात सुरू असलेल्या कोर्टकेसमुळे. एंबरने जॉनीवर कौटुंबिक अत्याचाराची केस केली होती. त्याविरोधात जॉनीने एंबरवर ५० मिलीयन डॉलरच्या मानहानीचा दावा ठोकला आहे. याच केसच्या सुनावणीमुळे ही जोडी चर्चेत आली आहे.