यावेळी राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला धारेवर धरले. भाजप आणि शिवसेनेची केंद्रात सत्ता होती तेव्हा औरंगाबादच्या नामांतरचा प्रश्न का सोडवला नाही? उद्या औरंगाबादचे नामांतर झाले तर कशावर बोलायचे, हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडतो. त्यामुळे हा मुद्दा सतत पेटवत ठेवला जातो. संभाजीनगर, जालन्यात १०-१० दिवस पाणी येत नाही. पण त्या प्रश्नावर कोणी बोलत नाही. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनंती करतो की, त्यांनी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावावा, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींकडे तीन मागण्या
या भाषणावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे तीन मागण्या केल्या. देशात समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा आणावा आणि औरंगाबादचं नामांतर करा, या मागण्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण कराव्यात, असे राज ठाकरे यांनी म्हटले. राजकारणासाठी हिंदू मुस्लीमांच्या विरोधात बोलण्यासाठी एमआयएमला मोठं केलं. आपण एक राक्षस वाढवतोय, हे लक्षात आलं नाही. एमआयएमचा खासदार निवडून आला. शिवसेनेचा तिकडचा खासदार पडला आणि एमआयएमचा खासदार निवडून आला, अशी टीका राज ठाकरेंनी केली. औरंगजेब हा शरद पवार यांना सुफी संत वाटतो का? अफजलखान हा त्याचं राज्य वाढवायला आला होता असं म्हणतात. तो शिवाजी महाराजांना मारायला आला होता, असे राज ठाकरे म्हणाले.