काही दिवसांपूर्वी जवळचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत हृता आणि प्रतिकचं लग्न पार पडलं. तिच्या या खास दिवसाचे काही फोटो शेअर करत तिनं लग्नाची बातमी दिली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह मनोरंजनविश्वातील कलाकारांनीदेखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लग्नानंतर हृता आणि प्रतिक हनिमूनसाठी परदेशात गेले आहेत.
हृता आणि प्रतिक दोघंही मनोरंजन सृष्टीत कार्यरत असल्यानं दोघंही त्यांच्या कामात व्यग्र असतात. वेळात वेळ काढून हनिमूनला दोघंही हनिमूनला गेले आहेत.हृता आणि प्रतिक टर्की या देशात हनिमून एन्जॉय करताना दिसत आहेत. हृतानं काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
मनोरंजनविश्वात कार्यरत राहणार
हृतानं मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. लग्नानंतरही मनोरंजनविश्वात कार्यरत राहणार असल्याचं तिनं काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत सांगितलं आहे. तिचा ‘अनन्या’ हा चित्रपटही लवकरच चाहत्यांसमोर येणार असल्याची चर्चा आहे.