हिंगोली : जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याच्या डोक्यात लाकडाने वार करून हत्या केल्याची घटना रविवारी २२ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. देवानंद संतोष मुधोळ (वय २०) असे या शेतकऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार येथील संतोष मुधोळ यांचे गावापासून काही अंतरावर १२ एकर शेत आहे. शेताजवळूनच कालवा गेला असल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देता येते. देवानंद हा मागील काही दिवसापासून शेतात रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी जात होता. नेहमीप्रमाणे देवानंद हा शनिवारी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. आज सकाळी तो घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.

४ वर्षानंतर मुंबईने घेतला बदला, दिल्लीचा हिशोब चुकता
बाजूच्या शेतकऱ्यांच्या आलं लक्षात…

सकाळी नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुधोळ यांच्या शेजारी शेत असलेले शेतकरी शेतात जात असताना देवानंद याचा मृतदेह बाजेवर आढळून आला. या प्रकाराची माहिती शेतकऱ्यांनी तातडीने गावात कळवली. त्यानंतर देवानंदच्या कुटुंबियांनी शेतात धाव घेतली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आमदार संतोष बांगर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम आणि माजी सभापती फकीरराव मुंडे यांनी शेतात जाऊन पाहणी केली.

संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार? शिवसेना नेते ट्रायडंट हॉटेलमध्ये भेटीसाठी दाखल
डोक्यात लाकडाने वार करून हत्या…

यावेळी शेतामध्ये बाजेवर देवानंद याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात लाकडाने वार करून हत्या केल्याचे स्पष्ट झाले. डोक्यात वार करण्यासाठी वापरलेले लाकूड देखील बाजेच्या बाजूला आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, कळमनुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूनील निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोयलावार, उपनिरीक्षक सोनुळे, जमादार घ्यार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे.

नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा
दरम्यान, देवानंदच्या मारेकर्‍याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कळमनुरी पोलिसांनी सांगितले. मयत देवानंद मुधोळ यांच्या पश्चात आई, वडील भाऊ व बहीण असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here