सोलापूर: जिल्ह्यातील पंढरपूर – मोहोळ महामार्गावर पेनूरहद्दीत माळी पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे. स्कॉर्पिओ आणि इर्टिगाची सामोरा समोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले आहेत. दरम्यान, मृतकांना शवविच्छेदनासाठी हाॅस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तर मृतकांची ओळख अद्याप पटलेली नाही.

या अपघातात सहा जण ठार झाले असून सर्व मृत हे मोहोळच्या डॉ खान आणि हुंडेकरी गादेगाव (ता.पंढरपूर) परिवारातील सदस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. डॉ खान परिवारातील सदस्य हे पंढरपूरहून मोहोळकडे निघाले होते तर हुंडेकरी परिवारातील सदस्य हे सोलापूरहून पंढरपूरकडे निघाले होते.अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. पोलीस पंचनामा सुरु असून घटनास्थळी मदतकार्य सुरु आहे. आता मोहोळ पोलीस ठाण्याचे अपघात पथक घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्तांना मोहोळ कुटीर रुग्णालय आणि सोलापूर शासकीय रुग्णालयात हलविण्यात येत आहे.

एसी रूममध्ये बसून राजकारण होत नाही! भाजप खासदाराचा पक्षाला रामराम; ममतांचा मोदींना धक्का

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here