सोलापूर: जिल्ह्यातील पंढरपूर – मोहोळ महामार्गावर पेनूरहद्दीत माळी पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे. स्कॉर्पिओ आणि इर्टिगाची सामोरा समोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले आहेत. दरम्यान, मृतकांना शवविच्छेदनासाठी हाॅस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.

या अपघाताबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ येथील मागील तीन पिढ्यांपासून वैद्यकिय व्यवसायामध्ये असलेल्या खान कुटुंबियातील डॉ.अफरीन खान -आतार (वय ३०) त्यांचे पती मुजाहीद ईमाम आतार (वय ३५ ), मुलगा अरमान मुजाहीद आतार (वय ५ ) यांच्यासह डॉ.अफरीन खान -आतार यांचे भाऊ नातेवाईक हे कौटुंबिक कार्यानिमीत्त स्वताच्या सेलेरिया गाडी नं एमएच १३ डिटी ८७०१ या गाडीने बाहेरगावी गेले होते. आज रविवारी ते पंढरपूरहून परत आपल्या घरी मोहोळ येथे परत येत असताना पंढरपूरकडे निघालेल्या स्कॉपीओ गाडी नं. एम एच १३ डी इ १२४२ या गाडीने समोरासमोर जोराची धडक दिली. त्यात कारमधील सहा जण ठार झाले.

१) बेनजीर इरफान खान
२) इरफान मुरखान खान
३) मुजाहीत इमाम अत्तार
४) अफरीन मुजाहीत अत्तार
५) इनामा इरफान खान
६) आरफत जाहीद अत्तार

SRH vs PBKS Live Score IPL 2022 : पंजाब आणि हैदराबादच्या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स
या अपघातातील इतर चारजण गंभीर जखमी असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांना मोहोळ येथाल ग्रामीण रुग्णालयातमध्ये शवविच्छेदनासाठी हलवले असून अपघातातील जखमी अनिल हुंडेकरी (वय ३५) मनीषा मोहोन हुंडेकरी (वय ३०) रा. गादेगांव ता.पंढरपूर अरहान ईरफान खान (आतार वय १०) रा. मोहोळ यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले आहे. मोहोळ पोलीस पुढील तपास करत आहेत,तर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

नवीन फोन खरेदी करताय? त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या सर्वात बेस्ट स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here