उस्मानाबाद : प्रियकरासोबतच्या अनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने वयोवृद्ध आई व प्रियकाराच्या मदतीने क्रूरपणे खून केल्याची भयानक घटना घडली आहे. शहरातील काळे प्लॉट मध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. सिद्धू शिवराज पवार(वय ३८ ) असे मयताचे नाव असून याप्रकरणी मयताची पत्नी ,सासू व पत्नीच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. विशेष म्हणजे आरोपी प्रियकर हा नगरपरिषदचा कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबतीत अधिक माहिती अशी की, शहरातील काळे प्लॉट भागात सिद्धू पवार हा ऑटोरिक्षा चालक आपल्या पत्नी व दोन मुले व वडिलासह राहत होता. दरम्यानच्या काळात आरोपी पत्नी ज्योती व धनराज यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मयत सिद्धु यास समजली. यावरून सतत भांडण होत होते अशी माहिती शेजारी मंडळीनी दिली.

राज्य सरकारकडून पेट्रोल, डिझेल दरात कपात; जाणून घ्या प्रमुख शहरांमधील नवे दर
अनैतिक संबंधास अडसर होणाऱ्या पतीचा कायमचा काटा काढन्याच्या उद्देशाने शनिवारी रात्री उशीरा राहत्या घरी आरोपी ज्योती सिध्दू पवार वय ३०, मयताची सासू शकुंतला महादेव जाधव वय ६५ व आरोपी प्रियकर धनराज एकनाथ सुरवसे वय ४८ यांनी रात्री उशीरा मयत सिद्धू पवार यांचा तोंड व गळा दाबून खून केला. या प्रकरणी रविवारी सकाळी गल्लीतील नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती कळविली.

SRH vs PBKS Live Score IPL 2022 : पंजाब आणि हैदराबादच्या सामन्याचे लाइव्ह अपडेट्स
दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. परिस्थिती संशयास्पद असल्याने वरील आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले व चौकशी केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड हे तपास करीत आहेत.

Sim Card: तुमच्या नावावर किती जणांनी घेतले आहे सिम कार्ड? या सोप्या प्रोसेसने मिळेल संपूर्ण माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here