राज ठाकरे यांचे व्याही प्राध्यापक संजय बोरुडे यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी मुंबई पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी केली. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक किस्से सांगितले. मुलांमुळे मला झोमॅटोसारख्या गोष्टी माहिती झाल्या. त्यावरून मी घरी अनेक पदार्थ मागवतो. त्यांच्यासोबत मीदखील कधीकधी वाहत जातो, असे राज ठाकरे यांनी म्हटले. पण नशीबाने माझ्या घरामध्येच डॉक्टर असल्यामुळे आता आम्ही बराच कंट्रोल ठेवत असतो. कित्येकदा मी संध्याकाळी डॉक्टरांना (संजय बोरूडे) विचारतो, आज काय जेवणार? त्यावर ते, मी काही नाही, असे म्हणतात. पण डायनिंग टेबल लागलं की ते येऊन जेवायला सुरुवात करतात. त्यामुळे माझा संध्याकाळचा कंट्रोल आणि डायनिंग टेबलवरचा कंट्रोल, असे दोन वेगवेगळे कंट्रोल असतात. संध्याकाळी मी एक वेगळा कंट्रोल घेतो. पण डायनिंग टेबलवर बसल्यानंतर माझा कंट्रोल निघून जातो. डॉक्टर थोडचं खातात, पण मी जरा जास्त खातो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरेंनी ऑपरशेनचा निर्णय का घेतला?
मी खरंतर बॅडमिंटन खेळणार, क्रिकेट खेळणारा, टेनिस खेळणारा आहे. पण सध्या मला कोणताही व्यायाम करता येत नाहीये. मला कुठलाही खेळ खेळता येत नाही. त्यामुळे मी त्या गोष्टीला विटलो आणि म्हणालो एकदाचं ऑपरेशन करून टाकू. अर्थात त्यानंतर मला फार धावता येईल, असंही नाहीये. पण त्यानंतर सगळं सुरळीत होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण सगळ्यांनी या गोष्टींची खरंच काळजी घेणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.