akola news today: प्लॅस्टिक पिशवीत मृत अर्भक रस्त्यावर फेकलं, गाडीने चिरडलं; अकोल्यात खळबळजनक घटना – vehicle passing by dead infant thrown in plastic bag shocking incident in akola
अकोला : माणुसकीला काळिमा फासणारी घटना अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या कान्हेरी सरपमध्ये समोर आली आहे. चक्क रस्त्यावर प्लॅस्टिक पिशवीमध्ये मृतक अर्भक टाकून पलायन केल्याची घटना घडली. या घटनेत रस्त्यावर टाकून देण्यात आलेल्या अर्भकावरुन अज्ञात वाहन गेल्याने नेमक पुरष किंवा स्त्री जातीच आहे, हे कळू शकले नाही
मिळालेल्या माहितीनुसार, काल रविवारी दुपारच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या कान्हेरी सरप रस्त्यावर प्लॅस्टिक पिशवीमध्ये अर्भक टाकून दिले. मात्र, या अर्भकाकड़े कोणाचंही लक्ष गेले नाही. त्यानंतर अर्भकावरुन अज्ञात वाहन गेले. याची माहिती बार्शीटाकळी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपासासाठी मृत अर्भक ताब्यात घेतलं असून ते वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. इलेक्ट्रिक दुचाकीची बॅटरी चार्ज करताना घात झाला; साताऱ्यात तरुणीचा मृत्यू सध्या बार्शीटाकळी पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. या अर्भकाला प्लॅस्टिक पिशवीत नेमके कुणी या परिसरात टाकले, याचाही तपास पोलीस करणार आहे. तसेच या अर्भकास असे बेवारसपणे सोडणाऱ्यांचाही शोध घेतला जात आहे.
अनैतिक संबंध लपवण्याचा प्रयत्न…
सदरचे अर्भक अनैतिक संबंधातून असावे. हे संबंध लपवण्यासाठी संबंधित महिलेने हे अर्भक बस स्थानक परिसरात सोडून दिले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अज्ञात व्यक्तिच्या विरोधात सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ते ‘अर्भक’ कोणाचं आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.