नवी दिल्ली : दिल्लीमध्ये घरात सापडलेल्या आई आणि दोन मुलींच्या हत्येनं खळबळ उडाली असून यामुळे हाऊस ऑफ सिक्रेट या घटनेची आठवण होते. असाच काहीसा प्रकार दक्षिण दिल्लीच्या वसंत विहारमधील फ्लॅटमध्ये (Vasant Vihar Suicide Case) घडला आहे. इथं आई आणि दोन मुलींच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटवरून हे सामूहिक आत्महत्येचं प्रकरण असल्याचं समोर आलं आहे. या घटनेमध्ये घरात अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत की ज्याने पोलिसही हैराण आहेत.

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी आई आणि दोन्ही मुलींनी त्यांच्या २०७ क्रमांकाच्या फ्लॅटचे गॅस चेंबरमध्ये रूपांतर केलं होतं. घराचे सर्व दरवाजे, खिडक्या पॉलिथिनने बंद करण्यात आल्या होत्या. गॅस सिलिंडरचा नॉबही उघडाच होता. शेजारी एक जळणारी चुलही सापडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघींच्याही तोंडातून फेस आणि रक्त येत होतं.

हेही वाचा – प्लॅस्टिक पिशवीत मृत अर्भक रस्त्यावर फेकलं, गाडीने चिरडलं; अकोल्यात खळबळजनक घटना
विषारी औषध पिऊन आत्महत्या…

जळत्या चुलीच्या धुरामुळे तडफडून मृत्यू होऊ नये यासाठी मृत्यूआधीच तिघींनीही विषारी औषध प्राशन केल्याचं सांगण्यात येत आहे. हा सर्व प्रकार त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहला आहे. त्यात त्यांनी लिहलं की, ‘घरामध्ये विषारी गॅस आहे. त्यामुळे दरवाजा उघडल्यानंतर कोणीही लायटर किंवा माचिस पेटवू नये.’

शनिवारी रात्री पोलिसांना मंजू श्रीवास्तव (५५) आणि त्यांच्या दोन मुली अंकिता (३०) आणि अंशुता (२६) यांचे मृतदेह सापडले. त्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – समुद्रातून वाहून आलेल्या सोन्याच्या रथाचे अखेर रहस्य उलगडले, सत्य वाचून थक्क व्हाल…

चिठ्ठीत लिहलं, ‘आम्ही पुन्हा एकत्र येऊ’

घरातून सापडलेल्या १० पानी सुसाईड नोटमध्ये ‘आम्ही या जगातून जात आहोत, पण पुन्हा एकत्र येऊ’ अशा ओळी लिहिल्या आहेत. पती उमेश श्रीवास्तव यांच्या निधनानंतर मंजू आणि दोन्ही मुली डिप्रेशनमध्ये गेल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. तिघांचेही उमेशवर खूप प्रेम होते. आई खूप दिवसांपासून आजारी होती आणि मोठी मुलगीदेखील काही दिवसांपासून आजारी होती आणि दोघीही बेडवर होत्या. कुटुंबालाही त्रास सहन करावा लागत होता. यातूनच त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.

स्वतःला मारले, पण लोकांना सावध केले

शुक्रवारी सायंकाळी मुलीने दूध देणाऱ्याला शनिवारी दूध न देण्यास सांगितलं होतं. हे कुटुंब खूप छान होतं, पण काही आर्थिक अडचणी नक्कीच होत्या अशी प्रतिक्रिया परिसरातील लोकांनी दिली आहे. या कुटुंबाच्या मनात काय होतं, याचा कोणीही अंदाज लावू शकणार नाही. कारण, त्यांनी स्वत: आत्महत्या केली पण इतरांना मात्र सावध केलं. कारण, घराचे गेट उघडताच समोरच्या भिंतीवर सुसाईड नोटमधून एक चिठ्ठी चिकटवली होती, ज्यामध्ये कोणीही गेट ऑन करू नये, असे लिहिले होते. किंवा गेट उघडल्याबरोबर कोणताही सामन पेटवू नका. कारण, घरामध्ये कार्बन मोनॉक्साईड वायू आहे. त्यामुळे आधी हा विषारी वायू बाहेर काढा आणि मगच आत या. अन्यथा ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते. खरंतर, ही चिठ्ठी वाचून फ्लॅटच्या आत गेलेले पोलिसही भावूक झाले कारण मृत्यूनंतरही त्यांनी इतरांच्या जीवाची काळजी घेतली.

प्रेमाचा खून! १९ वर्षीय तरुणीची गोव्याच्या किनारी निर्घृण हत्या, प्रियकराने केला धक्कादायक खुलासा

याआधीही केला होता सामूहिक आत्यहत्येचा विचार…

या कुटुंबाने ज्या प्रकारे आत्महत्या केली, पोलिसांचा असा समज आहे की यासाठी त्याने आधी इंटरनेटवर सर्च केलं असावं. पोलिसांनी तिघांचेही मोबाईल ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. दरम्यान, दक्षिण-पश्चिम दिल्लीचे डीसीपी मनोज सी यांनी हे सामूहिक आत्महत्येचं प्रकरण असल्याचं सांगितलं आहे. सुसाईड नोटमध्ये असंही लिहिलं आहे की, वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी सामूहिक आत्महत्येचा विचार केला होता, परंतु तेव्हा शक्य झालं नाही.

सहा महिन्यांआधीच झाला होता आत्महत्येचा प्लॅन

कॉलनीत राहणारे माजी नगरसेवक मनीष अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा फ्लॅट क्रमांक-२०६ आणि फ्लॅट क्रमांक-२०७ आहे. २०६ भाड्याने आहे, पण गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ती खोली रिकामे केली. भाडेकरूने आत्महत्येच्या प्रयत्नानंतर पोलिसांना संशय येऊ नये म्हणून घर रिकामे केल्याचंही या चिठ्ठीत नमूद करण्यात आलं आहे. सहा महिन्यांपूर्वीच या कुटुंबाने सामूहिक आत्महत्येची योजना आखली होती.

महत्त्वाची बातमी! …म्हणून ३१ मे रोजी देशभरात रेल्वे धावणार नाही?, वाचा सविस्तर
पतीच्या निधनानंतर कुटुंबावर शोककळा…

या प्रकरणी सगळ्यात आधी पोलिसांना कॉल करणाऱ्या शेजाऱ्यांनी सांगितलं की, RWA अध्यक्ष एम. डेव्हिड यांनी सांगितलं की, कुटुंब शांत स्वभावाचं होतं. हे इथले जुने रहिवासी होते. गतवर्षी मंजूचा पती उमेश यांचा करोनाने मृत्यू झाल्याने हे कुटुंब दुभंगले होते. कुटुंबाला सांभाळण्यासाठी आरडब्ल्यूएच्या वतीने प्रयत्नही करण्यात आले, पण हे लोक असं करतील याची कल्पनाही कोणी केली नव्हती.

I Quit लिहिलं, बायको आवडत नव्हती, लग्नानंतर पाच महिन्यातच तिला विधवा करुन गेला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here