चंद्रपूर: चंद्रपूरच्या सिनाळा जंगलात राज्यातील सर्वात वयोवृद्ध वाघाचा नैसर्गिक मृत्यू झालाय. तो १७ वर्षांचा होता. एवढ्या वयाचा राज्यातील हा एकमेव वाघ असल्याचे सांगितले जाते. हा वाघ ‘वाघडोह‘ नावाने प्रसिद्ध होता.

हेही वाचा – उन्हामुळे वैतागलेल्या ‘आर्ची’ने गाठला पाणवठा, टिपेश्वर अभयारण्यातील PHOTO नक्की पाहा

वाघडोह हा वाघ प्रचंड धिप्पाड होता. प्रारंभीचा काळ ताडोबा व्याघ्र प्रकल्पात घालवल्यानंतर युवा वाघांनी त्याला वृद्धापकाळात बाहेर हुसकावले. तेव्हापासून तो ताडोबाच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या जंगलात भटकत होता. वय वाढल्याने शिकार करण्यावर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे गावाशेजारी वास्तव्य करून सहज मिळणारी शिकार करून तो जगत होता.

वाघडोह

हेही वाचा –दोन वर्षांत तीन हजार वाघांचा खून

२१ मे रोजी सिनाळा येथे एका गुरख्याचा मृत्यू झाला होता. तो याच वाघाने केल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी त्याचा जर्जर अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हाच त्याच्या जगण्यावर प्रश्न निर्माण झाला होता. आज सिनाळा जंगलात त्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे सर्व अवयव शाबूत असून, एक दीर्घकाळ जगलेला वाघ मृत्युमुखी पडल्याने वन्यजीवप्रेमी व्यथित झाले आहेत.

टिपेश्वर अभयारण्यात उन्हाच्या झळा; ‘आर्ची’ तीन बछड्यांसह पाणवठ्यावर रमली

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here