अमरावती : पैसे चोरीच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील, असाच एक धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये समोर आला आहे. कारण, बँकेत बसून सुमारे चार तास रेकी केल्यानंतर एका ६० वर्षीय वृद्धांसोबत गप्पा मारत त्यांच्या घरी गेली. घरी गेल्यावर पाणी मागितले, पाणी प्यायली आणि त्या वृद्धाचे लक्ष चूकवून बँकेतून काढून आणलेली रोख रकमेची बॅगच लंपास केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

ही घटना मंगरुळ दस्तगीर इथे घडली होती. या प्रकरणी मंगरुळ पोलिसांनी या प्रकरणात रक्कम चोरणाऱ्या १७ वर्षीय युवतीला ताब्यात घेऊन तिने चोरलेली १६ हजार ५०० रुपयांची रक्कम जप्त केली. विनायक खंदूजी लोंढे (६०, रा. मंगरुळ दस्तगीर) यांची रक्कम चोरीला गेली होती.

पोलीस कर्मचाऱ्याची वसाहतमध्येच आत्महत्या, सुसाईड नोटमधील कारण वाचून हादराल…
मिळालेल्या माहितीनुसार, विनायक लोंढे हे अमरावतीत मजुरी करतात. ते सध्या गावी गेले असून, ते शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून त्यांनी १८ हजार रुपये काढले. त्यातील दीड हजार रुपये खिशात ठेवून उर्वरित १६ हजार ५०० रुपये पिशवीत टाकून ते घराकडे निघाले. यावेळी ही अनोळखी मुलगी बँकेपासून घरापर्यंत त्यांच्यासोबत गेली. यावेळी तिने लोंढे यांच्यासोबत गप्पाही मारल्या. ते घरी पोहोचल्यानंतर ती सुद्धा मागोमाग त्यांच्या घरात गेली आणि घरात जाऊन बसली.

याचवेळी तिने त्यांना पिण्यासाठी पाणी मागितले. लोंढे यांनी तिला थंड पाणी दिले. त्यावेळी थोडं पाणी पिऊन त्यांना म्हणाली की, मला फ्रिजमधील थंड पाणी नको, साधे पाणी द्या, म्हणून लोंढे तिच्यासाठी साधे पाणी आणण्यासाठी घरात गेले. यावेळी त्यांनी बँकेतून आणलेल्या रकमेची पिशवी समोरच ठेवली होती. ती पिशवी घेऊन या मुलीने पोबारा ठोकला.

दारं-खिडक्या बंद, घरात विषारी गॅस, गेटवरच सुसाईड नोट; रहस्यमय घरात आई आणि मुलींची सामूहिक आत्महत्या
याप्रकरणी विनायक लोंढे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. बँकेतील आणि बाहेरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या मुलीचा शोध घेऊन तिला ताब्यात घेऊन तिच्याकडील रोख जप्त केली आहे. या मुलीसोबत आणखी कोणी या गुन्ह्यात सहभागी आहे का? याबाबत तपास सुरू असल्याचे मंगरुळ दस्तगीरचे ठाणेदार एपीआय सुरज तेलगोटे यांनी सांगितले.

माहेरी गेलेल्या बायकोला घरी आणण्यासाठी नवऱ्याचा हायव्होल्टेज ड्रामा, पठ्ठ्या इलेक्ट्रीक टॉवरवर चढला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here