नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानी हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. त्यानंतर तुरुंगात असताना पोलिसांनी मला त्रास दिला, असा आरोप नवनीत राणा यांनी केला. याच तक्रारीबाबत आपलं म्हणणं मांडण्यासाठी आज नवनीत राणा या संसदीय अधिकार समितीसमोर हजेरी लावणार आहेत.

संसदीय अधिकार समितीसमोर जाण्याआधी नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधत मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. ‘ज्यांनी तुरुंगात माझा छळ केला आणि माझ्यासोबत तुरुंगात जे काही घडलं ते सगळं मी समितीसमोर मांडणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह ज्या ज्या विभागातील अधिकाऱ्यांनी मला त्रास दिला त्यांचा जबाब नोंदवावा, अशी विनंती मी करणार आहे,’ असं राणा यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद पाणीप्रश्न : अमित शहा आणि फडणवीसांचं नाव घेत जलील यांचा खळबळजनक आरोप

‘माझ्यावर जो अत्याचार झाला, तसा अत्याचार इतर कोणावर होऊ नये, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसंच लोकसभा सदस्य म्हणून मला जो अधिकार आहे त्याचा मी वापर करणार आहे. संविधानाचा खून करत माझ्यावर अत्याचार करण्यात आला. याबाबत आदेश देणाऱ्यांनाही आता उत्तर द्यावं लागणार आहे,’ असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर संसदीय अधिकार समितीकडून काय पावलं उचलली जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी कधी समजणार ?’ इंधन दरवाढीवरुन नवनीत राणांची उद्धव ठाकरेंवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here